जि. प.शाळा वाकपुर (दादापुर) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आनंदात साजरी…

युवराज डोंगरे/खल्लार 

           उपसंपादक

      विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ जि.प. शाळा वाकपूर(दादापूर)येथे आनंदात साजरी करण्यात आली.

             सकाळी सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक सुरज मंडे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून हरार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरुषी ईश्वर गडलिंग हिने केले तर आभार प्रदर्शन परी अतुल कराळे हिने पार पाडले.

           या प्रसंगी विध्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले त्यामधे प्रामुख्याने किंजल किरण ढवळे, प्रतिक राजू सोनोने, रितिका धनराज गडलिंग,अवनी आशिष बारसे, सक्षम अतुल कराळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूरज मंडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्वाचे गुण वैशिष्ट्ये व जीवन कार्य यावर प्रकाश टाकला आणि डॉ.बाबासाहेबांचे विचारानुसार आचरण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

         कार्यक्रमास प्रमुख रामेश्वर गडलिंग उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, तसेच अवधुतराव मोहोड उपस्थिती लाभली. या कार्यक्रमा करिता शाळेच्या सर्व विद्यार्थ्याचे सहकार्य लाभले.