गट ग्रामपंचायत भटेगाव च्या ग्रामसभे मध्ये झाला ठराव पारित… — संपूर्ण गाव दारूमुक्त होणार….

सुरज मेश्राम

तालुका प्रतिनिधी 

कुरखेडा-तालुक्यातील भटेगाव हे दारुमुक्त होणार असे ग्राम सभेने घेतला ठराव. मौजा-भटेगाव येथे दि.29/082023 ला ग्रामसभा पार पडली.

       ग्रामसभेच्या पुढाकाराने असे ठरविण्यात आले की संपूर्ण गाव दारू बंदी करायची असे सर्वांनू मते ठरविण्यात आले. व जो वेक्ती मोहफुल दारू चा वेवसाय आणि दारू चा सेवन करेल त्याला गट ग्रामपंचायत भटेगाव येतील असलेले दाखले किंवा इतर प्रमाणपत्र यांच्या पासून काही दिवस वंचित राहावे लागेल असे ग्रामसभा याच्या पुढाकाराने सर्वांनू मते ठरविण्यात आले व कुणी वेक्ती बाहेरील जाऊन जरी दारूचा सेवन करून आला आणि त्याने गावात तंटा घातल्यास त्याला पोलीसांच्या स्वाधीन करण्यात येईल असे ग्रामस्थांच्या सहकार्याने ठरविण्यात आले. व त्याच प्रमाणे नव्याने तंटामुक्त समिती च्या अध्यक्ष म्हणून नरेशभाऊ गजभिये यांची एक मताने निवड करण्यात आली.

         ग्रामसभेच्या अध्यक्ष स्थानि ग्रामपंचायत भटेगाव चे सरपंच ललीणा पुराम हे होते तर मोहण पुराम उप.सरपंच तथा जि.उपाध्यक्ष सरपंच संघ,सदस्य प्रविण दुगा , ईंदिरा पुराम,रेवता मारगाये,निता कन्नाके,पो.पा.रेष्मा पुराम, ग्रामसेवक बारसागडे उपस्थित होते तर सदर ग्रामसभेला खूप मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.