लाखनीत ‘नेचर पार्क’वर 7 वा ‘वृक्षांचा वाढदिवस’ व वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम… — ग्रीनफ्रेंड्सने साजरा केला “पर्यावरणस्नेही रक्षाबंधन” कार्यक्रम…

चेतक हत्तीमारे

जिल्हा प्रतिनिधी 

लाखनी-

 ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पर्यावरणस्नेही रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्ताने ‘7 वा वृक्षांचा वाढदिवस’ कार्यक्रम साजरा करून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वृक्षराख्या वृक्षांना बांधण्यात आले.तत्पूर्वी लाखनी नगरपंचायतचे नगरसेवक संदीप भांडारकर,ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त कलाशिक्षक दिनकर कालेजवार,ज्येष्ठ नागरिक मंगल खांडेकर,शिवलाल निखाडे,अशोक नंदेश्वर,ग्रीनफ्रेंड्सचे पदाधिकारी अशोक वैद्य, अशोक गायधने, योगेश वंजारी तसेच सुहानी पाखमोडे, नयना पाखमोडे इत्यादी जणांनी ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने बसस्थानक लाखनी,नगरपंचायत लाखनी,अशोका बिल्डकॉम् व शिवालय कन्स्ट्कशन कंपनी यांचे सहकार्याने तयार केलेल्या ‘नेचर पार्क’ ला 7 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गांडूळखताचा गोलाकार मोठया आकारात केक तयार करून त्यावर ‘7 वा वृक्षांचा वाढदिवस’ असे फुले- पानांनी सजविले व वृक्षांना बियाण्यापासून तयार केलेल्या पर्यावरण संदेश देणाऱ्या वृक्षराख्या झाडांना बांधल्या.त्यानंतर गांडुळखताचे पूजन करून गांडूळखत प्रत्येक झाडांना देण्यात आला. या कार्यक्रमास नेफडो विभागिय वन्यजीव समिती नागपूर जिल्हा भंडारा तसेच अ.भा अंनिस तालुका शाखा लाखनी जिल्हा भंडारा यांचे सुद्धा सहकार्य कार्यक्रमास लाभले.

  सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वहस्ते तयार केलेल्या पर्यावरण संदेशपर वृक्षराख्या बांधल्यावर ‘वृक्ष माझा सखा- मी त्याचा रक्षणकर्ता’,वृक्ष आहे -तर जीवन आहे’ असा उद्घोष एकाचवेळी केला.त्यानंतर वृक्षप्रतिज्ञा घेऊन ‘नेचर पार्क’वर सर्वांनी वृक्षारोपण केले .या आगळावेगळ्या अनोख्या अभिनव वृक्षवाढदिवस उपक्रमाचे प्रास्ताविक ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने तर संचालन ग्रीनफ्रेंड्स अध्यक्ष अशोक वैद्य तर आभार प्रदर्शन योगेश वंजारी यांनी केले. यावेळी पर्यावरणस्नेही रक्षाबंधन निमित्ताने ‘वृक्षराख्या बनवा स्पर्धा घेण्यात आली.

    या स्पर्धेत नैना पाखमोडे,केशवी मेश्राम,माही सोनटक्के, तनु सोनटक्के यांना राणी लक्ष्मीबाई शाळा मिडलस्कुल गटातून अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच प्रोत्साहनपर क्रमांक देण्यात आला.राणी लक्ष्मीबाई शाळेतून हायस्कूल गटात सृष्टी वंजारी,वेदांती वंजारी, चारू वैद्य यांना अनुक्रमे प्रथम ,द्वितीय, तृतीय क्रमांक देण्यात आला.समर्थ विद्यालयातून इशांत वैद्य, मंथन वैद्य ,सौम्य वैद्य,यांना प्रथम ,द्वितीय, तृतीय क्रमांक देण्यात आला.सिद्धार्थ विद्यालयातून ओंकार चाचेरे तर गांधी विद्यालयातून मंथन चाचेरे यांना प्रथम, द्वितीय क्रमांक देण्यात आला.पर्यावरण संदेशपर बीज राखी स्पर्धेत केशवी मेश्राम,माही सोनटक्के, सौम्य वैद्य, चारू वैद्य,चैतन्य वंजारी ,सृष्टी वंजारी यांनी आपल्या विद्यालयातून प्रथम ,द्वितीय ,तृतीय क्रमांक प्राप्त केला.

  कार्यक्रमास यशस्वीपणे पार करण्याकरिता राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयाचे हरित सेना शिक्षिका निधी खेडीकर ,अशोका बिल्डकॉम्चे पर्यवेक्षक अभियंता नितेश नगरकर, सिद्धिविनायक हॉस्पिटल संचालक डॉ. मनोज आगलावे,मुंबई इंस्पेक्टर नेताराम मस्के,गुरुकुल आयटीआयचे प्राचार्य खुशाल मेश्राम,कृषी औषधी पुरस्कर्ते शेतकरी इंजि. राजेश गायधनी,रेंगेपार मातोश्री गोशाळेचे लालकृष्ण यादवराव कापगते,मुख्याध्यापक मोहन यादवराव कापगते, सुहानी पाखमोडे, नयना पाखमोडे, रोहन मांढरे यांनी अथक परिश्रम घेतले.