मागील तीन आठवड्यापासून बोअरवेल नादुरुस्त, कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी लक्ष देतील का?..

    राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधि 

           कुरखेडा शहरात बाजारवाडीतील मुख्य बोअरवेल मागील तीन आठवड्यापासून नादुरुस्त (बंद)असुन नगरपंचायत प्रशासनाला पत्रव्यवहार करूनही आचारसंहितेचे व निवडणुकीचे कारण सांगून दुरुस्ती कडे दुर्लक्ष करीत आहेत. परिसरातील व्यावसायीकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते आहे.

           भर उन्हाळ्यातही नगरपंचायत प्रशासनाच्या वेळ काढु धोरणामुळे व्यावसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.या नादुरुस्त बोअरवेल कडे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी लक्ष देतील का असा सवाल उपस्थित केला व्यवसायीक व नागरिकांकडुन करण्यात येत आहे.

          मुख्याधिकारी यांचे लक्ष नादुरुस्त बोअरवेल कडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक व्यवसायीक व पत्रकार शाम लांजेवार, गोवर्धन तंगडपल्लीवार यांनी नादुरुस्त बोअरवेल ला फुलांचा हार टाकून बोअरवेल कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी यांनी दुरुस्तीचे आदेश द्यावेत अशी मागणी व्यवसायीक व नागरिकांकडुन करण्यात येत आहे.