कुकडी ग्रामसभेचा पुढाकार मजुरांना मिळाला रोजगार… — रोजगार हमी योजनेतून रोपे एकेरीकरणाचे काम..

अश्विन बोदेले 

जिल्हा प्रतिनिधी

दखल न्यूज भारत

आरमोरी:- तालुक्यातील ग्रामसभा कुकडी (मोहटोला) अंतर्गत रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली. नैसर्गिक रोपांचे एकेरीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आल्याने स्थानिक मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध झाला.

           ग्रामसभेच्या वतीने काम सुरू झाल्याने ग्रामसभेत उत्साह व नवीन ऊर्जा मिळून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामसभा कुकडी येथे मनरेगा अंतर्गत नैसर्गिक रोपांचे एकेरीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन वैरागडचे वनपाल के. एस पिलारे यांच्या हस्ते झाले.

          30 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयानुसार सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आणि रोजगारांसोबतच वनाचे संवर्धन व व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामसभाद्वारे ही कामे केली जात आहेत. त्यामुळे वनसंवर्धन होईल असा विश्वास सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

            यावेळी तालुका कमिटी सदस्य पुरुषोत्तम किरंगे, वनरक्षक प्रशांत धात्रक, अध्यक्ष साईनाथ किरंगे, सचिव यादव लाडे, शुभम शेंद्रे , पौर्णिमा कुमोटी , सविता किरंगे , पुरुषोत्तम पदा, घनश्याम नवघरे तसेच कामावरील मजूर उपस्थित होते.