ऐतिहासिक शादल बाबा देवस्थान येथे भक्तांची गैरसोय,देणगी भरपूर विकास मात्र शुन्य…

युवराज डोंगरे/खल्लार

          उपसंपादक

           दर्यापूर तालुक्यामध्ये शादल बाबांचे मंदिर 200 वर्षांपूर्वीचे पुरातन मंदिर असून,शादल बाबाचे भक्त हे महाराष्ट्रासह,मध्य प्रदेश,गुजरात, छत्तीसगड,आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविक भक्त अमरावती जिल्ह्यातील उपराई येथे येतात.

          परंतु दोन ते अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या गावात हे 200 वर्षांपूर्वीचे पुरातन मंदिर असून,या मंदिराला पुरातत्त्व विभागाने ‘क’ दर्जा सुद्धा मान्य केला. मंदिरात येणाऱ्या भाविक भक्ताची येथे गैरसोय होत असून येथे भाविक भक्तांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही तिथे महिला भक्तांसाठी संडास बाथरूमची व्यवस्था नाही.

          चैत्र महिन्यात लाखोंची देणगी मंदिराला येत असताना हा पैसा जातो कुठे ?असा प्रश्न शादल बाबा भक्तांनी केला आहे.तसेच चैत्र महिन्यात बाहेरगावावरून येणाऱ्या भाविक भक्त तेथे स्वयंपाक करतात त्यांना तेथे राहण्याची व्यवस्था नाही.ही शोकांतीका आहे.

           माजी आमदार संजय बंड यांच्या स्थानिक निधीतून येथे हॉलचे बांधकाम करण्यात आले होते. भाविक भक्त त्या हॉल मध्ये गेले असता तिथले काही ट्रस्टी त्या हॉलची वसूली करतात आणि जबरदस्तीने भाविक भक्तांकडून पावत्या फाडण्याचं काम करत असून, मंदिराचा विकास मात्र मागील 15 वर्षांपासून शून्य आहे.

          याकडे शासनाने लक्ष देऊन मंदिर ताब्यात घ्यावे व मंदिराचा विकास करावा अशी मागणी शादलबाबा भक्तांनी व पंचक्रोशीतील नागरिकांनी केलेली आहे.

           अशीच जर गैरसोय तिथे भाविक भक्तांची होत राहिली तर येणाऱ्या काळात तिथे मोठा अनर्थ घडू शकतो.