इटकी फाट्यानजीक 60 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा आढळला मुतदेह…

युवराज डोंगरे/खल्लार

         उपसंपादक

            दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलिस स्टेशन हद्दीत इटकी फाट्यानजीक ऋषी महाराज मंदीराच्या काही अंतरावर झाडा-झुडपात डोक्याला जखम व अत्यंत दुर्गंधी युक्त अवस्थेत 60 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मुतदेह रविवार (दि.5) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

          दरम्यान घटनेची माहीती वाऱ्यासारखी पसरताच दर्यापूर-अंजनगाव राज्यमार्गावरील घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच घटनास्थळी येवदा व खल्लार पोलिस पथक दाखल झाले होते. इसमाच्या मृत्यूचे नेमके कारण व ओळख पटलेली नव्हती.

             शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट मदत कक्षाचे राहुल भुंबर आदींनी घटनास्थळावरुन मुतदेह रुगणवाहीकेतून दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

            सदर मृतदेह हा खल्लार पोलिस स्टेशन हद्दीत आढळल्याने याबाबत खल्लार पोलिसांत मर्ग दाखल करण्यात आला असून मृतदेह सापडलेला इसम कुठला याबाबतचा शोध खल्लारचे ठाणेदार प्रमोद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ किशोर घुगे हे करीत आहेत.