लाखनीत फुलले दुर्मिळ ब्रह्मकमळ फुल… — अशोकनगर मधील टोलीरामजी सार्वे यांच्या घरी उमलले 3 दुर्मिळ ब्रह्मकमळ…

चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी 

लाखनी:-

    लाखनी येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे तसेच लाखनी बसस्थानकावरील नेचर पार्कवर सकाळी योगा व्यायाम करणारे मानव सेवा मंडळाचे सक्रिय सदस्य अशोकनगर निवासी माजी पोलिस कर्मचारी टोलीरामजी सार्वे यांचे घरी दुर्मिळ असलेले 3 ब्रह्मकमळ फुल उगवले असून ते बघण्याकरिता नागरिकांची तोबा गर्दी होत आहे.

   मध्यरात्री ब्रह्मकमळ फुलल्यानंतर टोलीरामजी सार्वे यांनी ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनीचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने तसेच गुरुकुल आयटीआयचे प्राचार्य खुशालचंद्र मेश्राम यांना कळविली.त्यांनी तात्काळ त्यांच्या घरी रात्री भेट देऊन दर्शन घेतले.याबद्दल अधिक माहिती देताना गायधने सरांनी सांगितले की या झाडाचे नाव ‘एपिफायलम ऑक्झिपेटलंम’ असून हा मूळचा हिमालयात केदारनाथ जवळील पिंडारी घाटातील भागात याचे मूळ वास्तव्य व अधिवास असून हिमालयाच्या फुलो की घाटी क्षेत्रात पर्यटक याला आवर्जुन सप्टेंबर महिन्यात पाहण्यास जातात.विशेषतः हा फुल रात्र झाल्यावरच पूर्ण उगवतो व मध्यरात्री पूर्ण फुलतो तर सकाळी पाकळ्या पुन्हा बंद करतो.याला जुलै ते सप्टेंबर या काळातच वर्षातून एकदा फुल येत असतात.हा झाड सर्वत्र न आढळत असल्याने या फुलाचे दर्शन अत्यंत दुर्मिळ मानले जाते तसेच आध्यात्मिक -धार्मिक वनौषधीदृष्ट्या या फुलाचे तसेच झाडाचे खूप महत्व मानले गेले आहे.

अशा प्रकारचा दुर्मिळ ब्रहमकमळाचे दर्शन मिळाल्याने सर्व मानव सेवा मंडळाचे सदस्य ,ग्रीनफ्रेंड्स व नेफडो विभागीय वन्यजीव समिती नागपूर जिल्हा भंडारा व गुरुकुल आय टी आय चे कर्मचारी-विद्यार्थी यांनी टोलीरामजी सार्वे व त्यांचे कनिष्ठ पुत्र लोकेश सार्वे यांचे अभिनंदन केले आहेत.टोलीराम सार्वे यांचे घरी अनेक प्रकारचे दुर्मिळ वृक्षांची जोपासना केली जात असते यात प्रामुख्याने रूद्राक्ष,कल्पवृक्ष, आमरस(स्टार फ्रुट),अडेनिअम चे दुर्मिळ वृक्षांना जोपासत आहेत. ते स्वतः व त्यांचे चिरंजीव लोकेश सार्वे वृक्ष,झाडांवर येणारे पक्षी- प्राणी यांची सेवा करीत असतात.मेजर सुभेदार ऋषी वंजारी, गुरुकुल आय टी आय प्राचार्य खुशालचंद्र मेश्राम,रामकृष्ण गिर्हेपुंजे,ऍड.शफी लद्धानी,भीमराव गभने,धनंजय तिरपुडे, गोपाल बोरकर, डॉ.पंढरीनाथ इलमकर,रमेश गभने,ताराचंद गिर्हेपुंजे,सुभाष बावनकुळे,अशोक हलमारे,दिलीप निर्वाण,मारोतराव कावळे,डॉ.दिलीप अंबादे,सुनील खेडीकर,वसंत मेश्राम,अशोक वैद्य,मंगल खांडेकर, अशोक नंदेश्वर, विनायक कावळे,शिवलाल निखाडे, माणिक निखाडे, रामकृष्ण शिंदे,भीमराव कांबळे,भैय्या बावनकुळे, विद्यमान जाधव,मधूकर गायधनी,चांगदेव वंजारी,रतीराम गायधने,पुरुषोत्तम मटाले,अशोक धरमसारे,दुलीचंद बोरकर इत्यादीं मानव सेवा मंडळ व ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब च्या सदस्यांनी दुर्मिळ ब्रह्मकमळाचे दर्शन घेऊन टोलीरामजी सार्वे यांचे अभिनंदन केले .