जिल्हा परिषद हायस्कूल साकोली येथे उन्हाळी शिबिर चे समारोपण…

 

 

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

 साकोली -विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेने आयोजित केलेले विविध पूर्ण उपक्रम उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आले होते .मागील 21 एप्रिल 23 ते 20 मे 23 पर्यंत 30 दिवस सातत्यपणे विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शकाच्या माध्यमाने खेळ , स्पर्धा ,क्रीडा , बुद्धिमत्ता ,चित्रकला , इंग्लिश स्पोकन , मेहंदी संगीत , नृत्य , असे विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. शिबिराच्या समारंभ कार्यक्रमात विविध स्पर्धा घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष .श्री चंद्रकांत वडीचार उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री. धर्मेंद्र कोचे सर शाळा समिती सदस्य गण सौ. पुष्पाताई कापगते ,सौ. शालिनीताई उईके तसेच शिक्षक म्हणून सौ.अतकरी मॅडम ,कु.पडोळे मॅडम, श्री चव्हाण सर उपस्थित होते. संपूर्ण शिबिराला यशस्वी बनवण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून श्री सुशांत बांडेबुचे सर ,श्री गिरीश सोनवणे सर ,श्री गुरुनुले सर श्री सुतार सर श्री महेंद्र घाडगे सर ,श्री रोकडे सर , रौनक मल्लानी, माहीन शेख तसेच गेस्ट लेक्चर चेस मार्गदर्शक श्री सागर साखरे सर यांनी मार्गदर्शन केले तसेच या शिबिरासाठी शाळेचे कर्मचारी श्री दिग्विजय चांदेवार ,श्री संजय चौधरी व कु. मनीषा खुणे यांनी योगदान दिले कार्यक्रमाच सूत्रसंचालन कु. पडोळे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन श्री गुरनुले सर यांनी पार पाडले….