माजी प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात आलेल्या मटन मेजवानीने काय साध्य केले? — मती,निती,गती..?

 

 प्रदीप रामटेके

मुख्य संपादक

          देशाचे माजी प्रधानमंत्री स्व.राजीव गांधी म्हटले की,बाॅम्ब स्फोटातंर्गत त्यांचा व इतरांच्या हत्यांचा धरारक व धक्कादायक घटनक्रम.

            बाॅम्ब स्फोटातंर्गत त्या हत्यांच्या भयानक दुःखद् घटनाक्रमाला कोणीही विसरू शकत नाही.

             माजी प्रधानमंत्री स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिमूर तालुक्यातंर्गत खडसंगी-मासळ जिल्हा परिषद क्षेत्रामधील मौजा खडसंगी येथील नंदू नागोसे यांच्या शेताशिवारात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन काॅंग्रेसचे युवा नेते दिवाकर निकुरे यांच्या द्वारा करण्यात आले होते.

         माजी प्रधानमंत्री स्व.राजीव गांधी यांचा स्मृतिदिन व कार्यकर्ता मेळावा काल रविवारला होता म्हणजे २१ में ला एकाच दिवशी होता.या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने माजी प्रधानमंत्री स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनाला महत्त्वहिन बनवून कार्यकर्त्यांना मटनाची मेजवानी देण्यात आली.

वरील व्हिडिओ मध्ये बघा कार्यक्रमाचे काही क्षणचित्रे..

               मात्र मटनाच्या मेजवानीने कार्यकर्ता मेळावा आयोजकांनी काय साध्य केले? हा प्रश्न चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील मतदारांना आता पडला आहे.

            योग्य निती अंतर्गत कार्याची दिशा गतिमान होत नसेल तर मती मारल्या जाते व याला कारण अविद्या असते असे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सांगून गेलेत.

            कार्याची सुरुवात भ्रमात व अतिउत्साहात होत असेल तर अशा कार्याला लोक महत्व देत नाही हे अनेकांनी अनेकदा अनुभवले आहे.असेच काहीतरी दिवाकर निकुरे यांच्या बाबतीत तर होत नाही ना?याची खातरजमा काॅंग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी करुन घेणे तेवढेच गरजेचे आहे.

            तद्वतच काॅंग्रेसचे युवा नेते दिवाकर निकुरे व त्यांचे सहकार्यवाहक यांनी प्रत्येक दिवशाची माहिती अगोदरच गोळा करणे आवश्यक आहे व त्या दिवशाचे महत्व जाणून घेणे त्यांच्यासाठी अतिशय स्वहिताचे आहे.

          कालच्या कार्यकर्ता मेळावा प्रसंगी कार्यकर्त्यांना देण्यात आलेली मटनाची मेजवानी भारतीय संस्कृती नुसार व काॅंग्रेस पक्ष निती नुसार अयोग्य होती,असा सुर पक्ष कार्यकर्त्यात व मतदारात आता उमटू लागला आहे.

        मात्र,माजी प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यकर्त्यांना देण्यात आलेली मटनाची मेजवानी म्हणजे माजी प्रधानमंत्री स्व.राजीव गांधी यांच्या कार्याचा, कर्तव्यचा,व दुःखद् हत्येचा अपमान नव्हे काय?हा मुद्दा गंभीर आहे..

२१ में च्या खडसंगी येथील काॅंग्रेस कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमांतर्गत छायाचित्रे…