डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कामगाराच्या सर्वोच्च रक्षणासाठी सक्षम :- समतादुत प्रज्ञा राजूरवाडे 

       रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

      भारतदेश हा कामगाराच्या श्रमाशीवाय उभा राहू शकत नाही,त्यामुळे भाडवलदार व श्रीमंत यांना भेदभावाची वर्तणूक करण्यापासुन रोखन्याचे कायदे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.

        श्रम हा घटक भारतीय संविधानाच्या समवर्तीसूचित समाविष्ट केला,त्यामूळे भारतीय संविधान कामगाराच्या सर्वोच्च रक्षनासाठी सक्षम आहे असे प्रतीपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टि पुणेच्या समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी महाराष्ट्र दीन व कामगार दीनानिमित्त अनुसूचित जाती मुलीचे शासकीय वस्तीगृह चिमुर येथे केले.

         भारतिय संविधान व कामकागाराविषयक कायदे या विषयावर आपल्याप्रमुख मार्गदर्शनात त्या बोलत होत्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वस्तीगृहाच्या मिरा काळे होत्या.

          पुढे बोलताना समतादुत प्रज्ञा राजूरवाडे म्हणाल्या कि भाग 3 व भाग 4 मध्ये कामगार वर्ग संबंधित कायद्याचा उलेख करतात,कलम 14 कायद्यापुढे समानता अनुच्छेद 19 (1)सी कामगार संघटना स्थापनेची हमी देते,ही संघटना कामगाराच्या कल्याणासाठी कायदेशीर बाजूने लढा देतात.अनुच्छेद 23 शोषण विरुद्धचा ह्क्क,माणसाचा अपव्यापार व वेठबीगारी यांना सक्त मणाई आहे.अनुच्छेद 24 कारखान्यात बालकाना कामास ठेवण्यास मनाई आहे.अनुच्छेद 39 (अ) प्रतेक नागरीकाना लैगीकतेच्या आधारे भेदभाव न करता रोजीरोटी मीळन्याचा अधिकार आहे.अनुच्छेद 39 (डी) पुरुष व स्त्री दोघानाही समान कामासाठी समान वेतन देन्यासाठी कटीब्ध आहे.अनुच्छेद 41-कामाचा ह्क्क प्रदान केला, अनुच्छेद 42 प्रसूती विषयक सहाय्य,अनुच्छेद 43 कामगाराना निर्वाह भता देणे,अनुच्छेद 43 (क) उद्योगधंदेच्या व्यवस्थापनात कामगाराचा सहभाग,अशा प्रकारे भारतातील कामगाराच्या समस्या समजून नविन कामगार कायदे बनविन्यात राज्य धोरणांचे मार्गदर्शक तत्वे काम करत असतात असे सविस्तर मार्गदर्शन समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी केले.

      या कार्यक्रमाचे संचालन शोभा चौधरी यांनी केले तर कामगा रदिनानिमित समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांच्या कडून सफाई कामगार अनिता कूळमेथे,अर्चना नदरे,सपना पाटील,मनिषा वाकडे,कल्पना जांभूळकर,सुधा सोनटक्के,संगीता मेश्राम, ज्योतषना शेन्डे यांचा सत्कार करण्यात आला.

       या कार्यक्रमातंर्गत आभार विशाखा मेश्राम यांनी मानले.