नांदरुन ग्रा.पं. ला कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्यात यावा… — ग्रामसेवक नसल्याने विकासकामे रखडली… — तीन, चार वर्षांपासून प्रभारी ग्रामसेवकाकडे कार्यभार… 

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

        दर्यापूर तालुक्यातील नांदरून व भामोद येथील ग्रामपंचायतीत ग्रामसेवक प्रभारी असल्यामुळे ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथे कायमस्वरूपी ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

         येथे नियुक्त असलेले ग्रामसेवक तीन ते चार ग्रामपंचायतींचा पदभार पाहत आहेत. यामुळे नांदरून ग्रामपंचायतीला येथील पूर्ण वेळ देता येत नाही. परिणामी, नागरिकांना गावात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे मागील तीन ते चार वर्षापासून या गावाना प्रभारीच ग्रामसेवक असल्यामुळे तेथील नागरिकांच्या समस्या वेळेवर सोडविला जात नाहीत.  

         येथे नियुक्त ग्रामसेवक चेतन तळोकार हे एरंडगाव ग्रामपंचायतीचा पदभार पाहतात. त्यांच्या कडे उर्वरित ग्रामपंचायत चा अतिरिक्त पदभार असल्यामुळे त्यांच्या सुद्धा नाकी नऊ येत आहे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला असून, तीन ते चार गावाचा पदभार सांभाळत आहेत.

            तालुक्यात ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या बदल्या झाल्या आहेत. अनेक ठिकाणी जागा रिक्त आहे.

             असा प्रकार हा संपूर्ण तालुक्यात पाहायला मिळत आहे कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्यामुळे नांदरून या गावाचा विकास पूर्णपणे कोलमडला दिसून येत आहे असा आरोप नांदरून येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांनी केला आहे.

           नांदरून येथील ग्रामपंचायतला कायमस्वरूपी ग्रामसेवक नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी गावातील नागरिकाकडून होत आहे.