पिंपरी बुद्रुक ते नरसिंहपुर सह दहा गावांच्या परिसरात मतदान शांततेत पार पडले…. — काही ठिकाणी रात्री नऊ वाजेपर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला…

  बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

पिंपरी बुद्रुक ते नरसिंहपुर परिसरातील दहा गावामधे मतदान शांततेत पार पडले तर मतदानाला ग्रामीण भागात चांगलाच प्रतिसाद मिळाला. कोणत्याही मतदान केंद्रावर काही आनुचित प्रकार घडलेला नसुनही प्रत्येक गावोगावी 75 ते 78 % टक्के मतदान झाले.

         मंगळवार दिनांक 7 मे रोजी संध्याकाळी मतदान मत पेटीत बंद झाले. येणाऱ्या 4 जून रोजी कोणाच्या गळ्यात बारामती लोक सभेची माळ पडणार हे या वेळी स्पष्ट होणार. 

          पिंपरी बुद्रुक मध्ये एकूण मतदान 1727 पैकी 1323 झाले. नरसिंहपुर यथे 1677 पैकी 1284 झाले.गिरवी 1450 पैकी 998,टणु 1720 पैकी 1178,गणेशवाडी 1064 पैकी 1284,, ओझरे 574 पैकी 434, लुुमेवाडी 2700 पैकी 1800 ,गोंदी 855 पैकी 657 ,सराटी 1842 पैकी 1412, या पद्धतीने सर्वच गावाची मतदान आकडेवारी आहे.

            सर्वच परिसरातील विद्यमान सरपंच, उपसरपंच, आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य , प्रत्येक गावचे पोलीस पाटील, व कार्यकर्त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन मतदान केंद्रावर मतदाराला आणण्यासाठी प्रयत्न करून मतदान घडवून आणले.

         तसेच वाड्या वस्तीवरील आजू बाजूला शेतामध्ये राहिलेल्या मतदाराला आणण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. वाहनांच्या साह्याने मतदाराला मतदान केंद्रावर आणण्यात आले.आपला मतदानाचा हाक्क मतदाराने बजाविला.

           बारामतीत एकाच कुटुंबात पवार परिवारा मध्ये कोण बाजी मारणार याकडे येणाऱ्या 4 जूनलाच स्पष्ट होणार याकडे उमेदवार व सर्व मतदारांचे लक्ष लागले आहे.