एनपीके विद्यालयाचा माध्यमिक ,उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल जाहीर… — शाळा आवारात पालकांची गर्दी…

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

        साकोली – माध्यमिक,उच्च माध्यमिक व कनिष्ठ विद्यालयाचा वार्षिक परीक्षेचा निकाल ६ मे रोजी एनपीके विद्यालयाच्या पटांगणात जाहीर केला. निकाल हाती घेण्यासाठी विद्यार्थी पालकाची मोठी गर्दी शाळेच्या आवारात झाली होती.अपेक्षेप्रमाणे यश मिळाल्याने काहींचे चेहरे फुलले होते तर कमी गुण मिळाल्याने काही जण हिरमुसलेले दिसले विद्यार्थी व पालक दोघांची उत्सुकता निकाल घेण्यासाठी शीगेला पोहोचली होती.

           विद्यार्थ्यांसह पालकांनीही शाळेत गर्दी केली उन्हाचा तडाका लक्षात घेता सकाळी साडेसात वाजता पासूनच निकालाच्या प्रति विद्यार्थ्यांच्या हाती दिल्या. कोणाला किती गुण मिळाले याची मोठी उत्सुकता असते हे उत्सुकता मित्रमंडळी व पालक यांनाही होती .आता येत्या 15 जून पासून नावे शैक्षणिक वर्ष सुरू होईल अशी माहिती शाळेकडून विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच डी.एस. बोरकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

           यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आर.बी.कापगते,सौ. एस एन गहाणे, के जी लोथे, एम एम कापगते ,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ऋग्वेद येवले, सुनील बोरकर, राजेश्वरजी घरत, ब्रिजलाल राऊत शिक्षक एल एस गहाने, एस.व्ही कामथे, एस आर देशमुख ,डी आर देशमुख, सी एस नागोसे ,के एम कापगते ,आर एम मिरासे ,आर सी बडोले ,एस वाय कऱ्हाडे, वी आर लिमजे,के एल लांजेवार ,एम आर शिवणकर, बी बी नाकाडे बी पी डोंगरवार व मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता.