दिल्ली इंग्लिश मीडियम स्कूल पारशिवनी येथील विद्यार्थ्यांचे नवोदय विद्यालयात परीक्षेत घवघवीत यश…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी

       पारशिवनी:-दिल्ली इंग्लिश मीडियम स्कूल पारशिवनी येथील वर्ग 5 चा विद्यार्थी मास्टर प्रियांशु गजभिये याने नवोदय विद्यालय परीक्षेमध्ये यश संपादन करीत आपले स्थान जवाहर नवोदय विद्यालयात मजबूत केले.

         त्याच्या यशाची संपूर्ण श्रेय दिल्ली इंग्लिश मीडियम हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री मुरलीधर चहांदे तसेच त्याचे पालक व शिक्षक यांना दिले. 

         प्रियांशू गजभिये च्या कामगिरीबद्दल त्याला शुभेच्छा देऊन भविष्यात उत्तरोत्तर प्रगती करील असा विश्वास व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे आपल्या विद्यालयात मुलांचा सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरी सुधारणा करण्याकडे संस्थेचा कल असतो आणि त्यामुळे संस्थेच्या निरीक्षिका कु. जानवी प्रकाश डोमकी यांनी प्रियांशु गजभिये च्या यशाबद्दल त्याला शुभेच्छा दिलेले आहेत.

          संस्थेचे सचिव व संचालक श्री प्रकाशजी डोमकी यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्याचे कौतुक केलेले आहे. तसेच प्रियांशु गजभिये ने शिक्षक व पालक यांच्या प्रति आभार व्यक्त केलेले आहे.