कुंभार समाज बांधव यांचे वतीने श्रीसंत शिरोमणी गोरोबा काका यांच्या मुर्तीचे प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न….

   राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधि 

           कुरखेडा येथील प्रभाग क्र.११ येथे समस्त कुंभार समाज बांधव यांचे वतीने श्री संत शिरोमणी गोरोबा काका महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त नविन मंदिराचे बांधकाम करुन श्रीसंत शिरोमणी गोरोबा काका महाराज यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा स्थापना शिवसेना जिल्हा प्रमुख (उ.बा.ठाकरे गट) सुरेंद्र सिंह चंदेल यांचे हस्ते संपन्न झाला. 

        याप्रसंगी शिवसेना तालुकाध्यक्ष आशिषभाऊ काळे,कॉंग्रेस पार्टी चे तालुकाध्यक्ष जिवन नाट,नगराध्यक्षा सौ अनिता बोरकर, उपाध्यक्ष बबलुभाई हुसैनी, विश्व हिंदु परिषदेचे कवियत्री संगीता ठलाल,वामनराव फाये, नगरसेविका कांताताई मठ्ठे, जयश्री रासेकर,पुंडलिक नेवारे महाराज,नगरसेवक अशोक कंगालेसह समाज बांधव, महिला भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन भोयर यांनी तर आभार प्रदर्शन विनोद बुरबांधे यांनी केले.