काव्य लेखन कार्यशाळा संपन्न…  — समर्थ महाविद्यालयाचा उपक्रम…

   चेतक हत्तिमारे 

जिल्हा प्रतिनिधि भंडारा 

       स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय लाखनी येथील मराठी विभागाअंतर्गत आणि विदर्भ साहित्य संघ शाखा लाखनी व विवेकानंद सार्वजनिक वाचनालय लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी काव्य लेखन कार्यशाळेचे आयोजन समर्थ महाविद्यालय लाखनी येथील भगिनी निवेदिता सभागृहात दि २ मे २०२४ रोजी आयोजित करण्यात आले होते.

         या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे व मराठी विभाग प्रमुख डॉ बंडू चौधरी, डॉ धनंजय गभने, विदर्भ साहित्य संघ शाखा लाखनीचे कार्यवाह डॉ मुक्ता आगाशे, वाचनालयाचे कार्यवाह प्रा. अजिंक्य भांडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

          या कार्यशाळेला कवयित्री डॉ. मुक्ता आगाशे आणि पालीकचंद बिसणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रात पालीकचंद बिसणे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अंगात एक तरी कौशल्य असणे आवश्यक आहे. आपल्याला कुठलीही गोष्ट येत नसली तरी ती सतत प्रयत्न केल्याने ते आपण आत्मसात करू शकतो. एखाद्या विषयावर काव्य लिखाण करायचे असल्यास त्या मुद्द्यावर आपण बुडून जायला हवे तरच ते काव्य आपण जगासमोर जिवंत स्वरूपात प्रगट करू शकू.

            यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कवितेचे तंत्र मंत्र अगदी व्यवस्थितपणे पटवून दिले. तर कार्यशाळेच्या दुसऱ्या टप्प्यात डॉ मुक्ता आगाशे यांनी आपल्या अनुभव कौशल्यांच्या आधारातून विद्यार्थ्यांच्या मनातील कविता त्यांना विविध विषय देऊन प्रत्यक्षपणे त्या कार्यशाळेतच त्यांच्याकडून काव्य तयार करून घेतले आणि विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण करून दिला. या कार्यशाळेला महाविद्यालयातील पन्नास हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता.

         कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आणि कार्यशाळा दरम्यान विद्यार्थ्यांनी लिखाण केलेले काव्य यावेळी गायन करण्यात आले. या कार्यशाळेचे संचालन प्रा. तेजराम चांदेवार यांनी तर प्रास्ताविक प्रा. अजिंक्य भांडारकर आणि आभार प्रा. रूपाली खेडीकर यांनी मानले. कार्यशाळेसाठी प्रा. युवराज जांभुळकर, स्वाती नवले, शितल कोमेजवार यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.