कन्हान पोलिस स्टेशनला जप्त असलेले वाहने आगीत जळून खाक…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी

        पारशिवनी::-पोलीस स्टेशन कहान येथील जुने कन्हान पोलीस स्टेशनला लागूनच जप्त असलेल्या वाहनाला जवळपास आज रविवार दुपारी १२ वा. ३० मिनिटाचा सुमारास जप्त केलेल्या वाहनांना आज रविवारला आग लागून नुकसान झाल्याची घटना घडली आहे. रविवारी घडलेल्या सदर घटनेत सुदैवाने कुणालाच ईजा व जिवीतहानी झालेली नाही.

         Bमिळालेल्या माहितीनुसार, कन्हान येथिल जुने पोलीस ठाण्याच्या लगतच असलेल्या परिसरात विविध गुन्ह्यात जप्त केलेली व दुर्घटनात जप्त अनेक दुचाकी वाहने मुद्देमाल म्हणून जमा असुन यात दुचाकी, चारचाकी वाहनेही मोठ्या प्रमाणात आहेत. रविवार ५/५/२४ च्या दुपारी अचानक या भंगार वाहनांच्या गर्दीतुन धुर निघायला लागला. अल्पावधित इथल्या वाहनांनी पेट घेतला.

           यावेळी नगर परिषद कन्हान ची अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याने पथकाची वाहन घटनास्थळी वेळवर पोहोचली. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

          पोलिस स्टेशनच्या स्टाफचे अधिकारी पोलिस कर्मी सुध्दा वेळेवर पोहचल्या वर दुघर्टना टळली.

          अद्याप पर्यंत आगीचे नेमके कारण समजलेले नाही. तरी याबाबत माहिती घेण्याचे काम कन्हान पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक,अधिकारी पुलिस कर्मचारी कारण शोध घेत असल्याचे कळते…