आलेबेदर येथे पाच दिवसीय विद्यार्थी उन्हाळी शिबिराचे समारोपीय कार्यक्रम… — राष्ट्रीय ट्रेनिंग चीप संघप्रिय नाग यांची उपस्थिती…

      ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

       साकोली -त्रिरत्न बुद्ध विहार आले बेदर येथे समता सैनिक दलातर्फे विद्यार्थ्यांचा पाच दिवसीय उन्हाळी शिबिर समारोपीय कार्यक्रम घेण्यात आले.

        याप्रसंगी राष्ट्रीय ट्रेनिंग चीप संघप्रिय नाग हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून राकेश बोरकर, समता सैनिक दलाचे जिल्हा आर सी फूलुके, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी, संतोष उटनकर, राकेश बोरकर, तनुजा नागदेवे, योगराज भोयर मोना मेश्राम रोशन फुले व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

           राष्ट्रीय ट्रेनिंगची संघप्रिय नाग व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी यांनी आपल्या भाषणात सांगितले की विद्यार्थी दिशे मधूनच बालवयातून चांगले विचार रुजवले जाऊ शकतात पाच दिवसांमध्ये जे काही ट्रेनिंग आपण घेतली त्या ट्रेनिंगच्या उपयोग आपल्या समोरच्या जीवनात कसं आणता येईल.भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार मनात कसा रुजवता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे असे व्यक्त केले.

          पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम,अंधश्रद्धा निर्मूलन,आरोग्य, कवायत, जुडो कराटे, व विविध उपक्रम राबविण्यात आले.

           तसेच विद्यार्थ्यांच्या पाच दिवसीय उन्हाळी ट्रेनिंग शिबिरामध्ये भोजनदान दिले असे सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी, उमेश मेश्राम, तनुजा नागदेवे, यांचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

         हे शिवीर अतिशय चांगलं झालं असून अशा पद्धतीची शिबिर वेळोवेळी घेतले गेले पाहिजे असे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केले.

        समारोपी कार्यक्रमाचे संचालक भंते महामोगलायन यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मोना मेश्राम ,स्वप्निल गणवीर , जितेंद्र बडोले ,आर्यन राऊत, प्रजय कराडे,साहिल मेश्राम, ईशांत खांडेकर ,अमित नागदेवे ,उमेश मेश्राम,व इतर कार्यकर्त्यांनी केला.