कुंभा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी….

     रोहन आदेवार 

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि

         वर्धा/यवतमाळ

मारेगाव: स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती तालुक्यातील कुंभा येथे मोठ्या उत्साहात पार पडली.

             यावेळी सर्व महिलांच्या हस्ते पूजन करण्यात आले व सरपंच अरविंदभाऊ ठाकरे, विजयभाऊ बोथले, जयवंतजी ठेपाले, वरुनभाऊ ठाकरे, कृष्णा सोनुले व इतर मान्यवरांच्या हस्ते पूजन करून हार अर्पण करण्यात आले.

             सत्यशोधक समाजाचे संस्थापक व महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे विचारवंत व समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि जातिभेद पाहून सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला.

           पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. अस्पृश्य मुलांसाठी पुण्यात शाळा स्थापन केली.

           त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकऱ्याचा असूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. 

           या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सुमित कोकुडे यांनी केले. यावेळी नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.