दर्शन बारी व पाण्याचे योग्य नियोजन करावे :-पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ… — आळंदी देवस्थानच्या सासवडच्या मुख्याधिकार्‍यांना सूचना सासवड येथील पालखी तळाची केली पाहणी…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर 29 जून ते 31 जुलै 2024 या कालावधीत संपन्न होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवड येथे दोन दिवस मुक्कामी येत असल्याने त्या अनुषंगाने सुविधा बाबत नियोजन करण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्‍वस्त व पालखी सोहळ्यातील प्रमुखांनी सासवड येथील पालखी तळाला भेट देऊन पाहणी केली.

          या पाहणी दरम्यान समितीने काही सूचना केल्या त्यामध्ये दर्शन रांगांचे बॅरिकेट नियोजन व पाण्याचे नियोजन करण्याबाबत मुख्याधिकार्‍यांना सूचना दिल्या.

           याप्रसंगी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अ‍ॅड.राजेंद्र उमप, पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ, पालखी सोहळ्याचे राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, मारुती कोकाटे, प्रदीप भूमकर तसेच पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, तहसीलदार डॉ.शैलेजा पाटील, सासवड नगरपालिकेचे डॉ.कैलास चव्हाण, माजी उपाध्यक्ष यशवंतकाका जगताप, माजी नगरसेवक अजित जगताप व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.