ब्रेकिंग न्यूज… — 62 वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या, खल्लार बाजार चौकातील घटना…

युवराज डोंगरे 

   उपसंपादक

        खल्लार येथिल 62 वर्षीय इसमाने आज दि(14) एप्रिल रोजी दुपारी 3:30 ते 4 वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खल्लार येथिल मुख्य बाजार चौकात उघडकीस आली.

         सुरेश देवराव सुकळीकर (62)असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव असुन सुरेश सुकळीकर यांचे खल्लार येथिल मुख्य बाजार चौकात दुसऱ्या माळ्यावर टेलरिंगचे दुकान आहे. हे दुकान भाड्याने आहे.दिवसभर त्यांचे दुकान सुरु राहायचे आज नेहमीप्रमाणे सुकळीकर यांनी दुकान उघडले दुपारी 3 वाजता ते घरुन बाजार चौकातील दुकानात आले.दुकान उघडले दुपारची वेळ असल्याने बाजार चौक सामसुम होता याच सुमारास त्यांनी दुकानच्या मागिल बाजूने असलेल्या दारातून बोळीत गळफास घेतला आपली जिवनयात्रा संपविली.

         घटनेची माहीती पोलिस पाटील अजाबराव लांडे यांनी पोलिसांना दिली त्यानुसार खल्लारचे ठाणेदार प्रमोद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर सिडाम,शरद डाहाके यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हारुग्णालय, दर्यापूर येथे पाठविला मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.