साखरी येथिल जि प शाळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी…

युवराज डोंगरे/खल्लार

          उपसंपादक

           खल्लार नजिकच्या साखरी येथिल जि प पूर्व माध्यमिक शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वि जयंती करण्यात आली.

              या कार्यक्रमाकरिता शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संदीप सिरसाट, मायाताई सिरसाठ अंगणवाडी सेविका संजीवनीताई नाकड शाळेच्या सहाय्यक शिक्षिका रेखाताई अभ्यंकर शाळेचे शिक्षक विजय बाबूलाल मकेश्वर उपस्थित होते.

            सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी बाबासाहेबांच्या शालेय जीवनापासून तर संविधान रचनेपर्यंतच्या केलेल्या कार्याबद्दल त्यांचे विचार आपल्या शब्दात व्यक्त केले.

            त्यामध्ये शाळेची विद्यार्थिनी गोपी राजकुमार बोबडे ,आराध्य संदीप सिरसाट ,स्पंदन अरविंद सिरसाट, आदर्श डवले, अंशू राजकुमार बोबडे ,जानवी विनोद चव्हाण, तनवी विनोद चव्हाण ,प्रसन्न विजय घाटे, गुंजन प्रफुल नवरंगे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

             त्यानंतर शाळेचे शिक्षक विजय बाबुलाल मकेश्वर आणि रेखाताई अभ्यंकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी ताई नाकड यांनी केले.तर आभार माया ताई सिरसाट यांनी मानले सरते शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.