साकोली येथे संत नरहरी सोनार पुण्यतिथी साजरी..

       ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

         साकोली – संत नरहरी सोनार मुख्य मंदिर नवीन बस स्टॉप समोर साकोली येथे दिनांक 27, 28 फेब्रुवारीला भारतीय सुवर्णकार समाज शाखा साकोली च्या वतीने संत शिरोमणी नरहरी सोनार यांची पुण्यतिथी तसेच मंदिरात संत नरहरी सोनार ,विठ्ठल रखुमाई व शिवलिंगचे प्राणप्रतिष्ठा करण्यात आले व सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

         याप्रसंगी प्रमुख पाहुणे माजी आमदार डॉ.हेमकृष्णा कापगते, माजी आमदार बाळाभाऊ काशिवार ,भाजपा तालुका अध्यक्ष अमोल हलमारे ,काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष अशोक कापगते ,डॉ शकुंतला कापगते, दिलीप मासुरकर ,नितीन खेडीकर, जि प सदस्या वनिता डोये, जि प सदस्या माहेश्वरी नेवारे ,माजी नगराध्यक्षा धनवंता राउत,माजी नगरसेविका मीना लांजेवार ,अमोल टेंभुर्णे, प्रभाकर सपाटे व अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

             या दोन दिवसीय कार्यक्रमाप्रसंगी शोभायात्रा, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम,महिलांसाठी हळदीकुंकू,कीर्तन,भजन, काला व महाप्रसाद देण्यात आला.

              यावेळी असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच ज्येष्ठ नागरिकांचा, समाजसेवकांचा व मूर्तिदात्यांच्या सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.

          या कार्यक्रमात सर्व सोनार समाज बांधवांनी सहकार्य केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष व्यंकटेश येवले,उपाध्यक्ष दिलीप निनावे, सचिव मयूर गजापुरे,कोषाध्यक्ष प्रकाश रोकडे,संयोजक किशोर पोगडे, राजेश ढोमणे, अजय भजे, गुणवंत गजापुरे, अशोक भरणे, चंद्रशेखर पोगडे, सदाशिव मस्के ,अमेय डुंबरे,भास्कर येवले, चुळाराम येवले, सुरज डुंबरे, हरीश पोगडे ,दिनेश गजापुरे महिला अध्यक्ष भारती गजापुरे, उपाध्यक्ष रेखा गजापुरे, सचिव बबिता भजे, माधुरी ढोमणे, अनिता पोगडे ,मीना येवले, धनश्री पोगडे, अरुणा येवले, सुनीता पोगडे ,भाविका येवले, सुरभी डुंभरे, पुष्पा गजापुरे, भूमिका येवले, वनिता इन्कने, प्रणाली हाडगे व समाजातील अनेक महिलांनी व पुरुषांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरेश हर्षे यांनी तर आभार प्रदर्शन व्यंकटेश येवले यांनी केला.