शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ) येथे १० वा वर्धापन दिन व बुद्ध धम्म मेळावा उत्साहात साजरा…

      ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

        भंडारा -महाबोधी उपासक संघ नागपूरच्या विद्यमाने शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चीचाळ) येथे १० वा वर्धापन दिन व बुद्ध धम्म मेळावा 27 फरवरी व 28 फरवरी 2024 ला इंदिरा सागर गोसे खुर्द जवळ लागून असलेल्या शांतीवन बुद्ध विहारात संपन्न झाला.

            या दोन्ही दिवशी संपन्न झालेल्या धम्म मेळाव्यात डॉ. भदंत मेत्तानंद, भदंत, विनयबोधी महाथेरो, भदंत नागसेन महाथेरो ,भदंत प्रसीलरत्न, भदंत रत्नसार ,भदंत संघानंद ,श्रामनेर बुद्ध पाल ,भिक्षुनी पट्टाचार्य ,भिक्षुनी संघमित्रा, भिक्षुनी सुमेधा , भिक्षुनी सुकेसनी , भिक्षुनी महामाया ,यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून उपासक, उपासिका यांना धम्मदेसना दिली.

          त्याचप्रमाणे वर्धापन दिन कार्यक्रमाचे उद्घाटन माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉ.सत्यपाल काटकर माजी प्राचार्य मनोचिकित्सक व शैक्षणिक समुपदेशक वरोरा चंद्रपूर उपस्थित होते.

           प्रमुख पाहुणे रोशन जांभुळकर अध्यक्ष संविधान संघर्ष समिती भंडारा, शांतीवन बुद्ध विहाराचे संस्थापक जीवनबोधी बौद्ध, शांतीवन बुद्धविहाराचे अध्यक्ष धम्मरक्षित बौद्ध, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदानंद धारगावे ,पंचायत समिती सदस्य सुवर्णा रामटेके, डीएफ कोचे, निमा रंगारी ,ऋषीजी वाघमारे समाज क्रांती आघाडी खेमराज मेश्राम बहुजन चॅनल संपादक चंद्रपूर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

             या दोन दिवशीय वर्धापन व धम्म मेळाव्यात बुद्ध धम्मा विषयी मार्गदर्शन ,समाज प्रबोधन कार्यक्रम, वैशाली उर्फ लावण्या मडावी यांनी रमाबाई ,भीम गीतावर आधारित नृत्य सादर केले. शाहीर ब्रह्मानंद वाहने यांनी सुद्धा समाज प्रबोधन केले.रात्री ७ ते १० वाजेपर्यंत राष्ट्रीय प्रबोधनकार सतीश सोमकुवर यांच्या समाज प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

            यावेळी त्यांच्यासोबत हार्मोनियम वादक वामनजी दांडेकर, तबलावादक दिनेश भांडूकर, गायक पांडुरंग अहिरकर सह गायक पंकज भगत उपस्थित होते.

                कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता विनय ढोके, गंगाधर गजभिये, प्रशांत बोदिले , आशिष मेश्राम ,अंबादास मेश्राम , सत्यपाल बौद्ध ,अश्विन मेश्राम ,लता भांबोरे ,वंदनाताई भरणे ,गुलाब घोडके , विनोद डोंगरे व इतर कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

              धम्म व वर्धापन दिन मेळाव्यात दोन्ही दिवशी येणाऱ्या सर्व उपासक, उपासिका यांची जेवणाची व निवासाची व्यवस्था करण्यात आली होती.