शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
आझाद वॉर्ड,बुद्ध विहार परिसरातील अवैध दारू विक्री तातडीने बंद करावी या हेतूने,१) श्रीमती गीता रवींद्र राऊत (नगरसेविका, चिमूर),2) श्री. रामदास तानसिंग राऊत (पोलीस पाटील चिमूर),3) समस्त आझाद वॉर्ड,बुद्ध विहार परिसरातील रहिवासी यांनी पोलिस स्टेशन चिमूर मध्ये तक्रार दिली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की,तक्रारदार आझाद वॉर्डातील रहिवासी आहेत.श्रिमती गीता रवींद्र राऊत,या प्रभागाच्या जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत.
यामुळे त्यांचेसह आझाद वार्डतील नागरिक (महिला-पुरुष) हे सदर वार्डात मोठ्या प्रमाणात सुरु असलेली अवैध दारु विक्री संपूर्ण बंद करावी यासाठी निवेदन देत आहोत.
दारु विक्रीच्या अवैध धंद्यांमुळे परिसरातील शांतता पूर्णपणे विस्कळीत झाली असून,तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे.मद्यपींच्या वावरामुळे महिला आणि शाळकरी मुलींना परिसरातून येण्या-जाण्यास भीती वाटते.या संदर्भात वारंवार सांगूनही संबंधित लोक हे व्यवसाय बंद करत नाहीत.
दारु विक्री करणारे व्यक्ती हे स्वत:च्या घरी दारु विक्री करत असून यामध्ये,१)निर्मला नंदेश्वर,२) मंगेश नंदेश्वर,३) संजय भैसारे यांचा समावेश आहे,असे निवेदनात नमूद केले आहे.
सदर तिन्ही व्यक्तींच्या घरी वेगवेगळ्या छुप्या मार्गाने दारूची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे.यामुळे भविष्यात मोठी गुन्हेगारी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन कर्त्यांची मागणी…
१. पोलीस प्रशासनाने वरील नमूद व्यक्तींवर त्वरित छापा टाकून कठोर कायदेशीर कारवाई करावी.
२. आझाद वॉर्डातील हे सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करून परिसर भवमुक्त करावा…
३. या परिसरात रोज दिवसा व रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त (Patrolling) नियमितपणे सुरू करावी.
निवेदनाची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी अशी विनंती ठाणेदार पोलिस स्टेशन चिमूर यांना करण्यात आली आहे.
सदर निवेदनावर आझाद वॉर्डातील इतर रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत.यामध्ये श्रीमती गीता रवींद्र राऊत (नगरसेविका),श्री.रामदास तानसिंग राऊत (पोलीस पाटील),शिवम सुरेन्द्रबाबु सोरदे,मंगेश संतोष भैसारे,अमित भैसारे,आदर्श भैसारे,आकाश भगत,सौ.अनुरुपा सोरदे,प्रज्ञा प्रणय सोरदे,मिलेश गौतम भैसारे,सौ.अल्का दिनेश भैसारे,श्रिदास एस.राउत,सुकेशिनी राउत,ओमकार.टी.लोणारे,शुभांगी रा.लोणारे,एम.एस.भैसारे, यांचा सहभाग आहे.



