Home Political भूम पंचायत समितीवर ‘वंचित’चा झेंडा,उपसभापतीपदी प्रियंका रणबागुल यांची निवड!…

भूम पंचायत समितीवर ‘वंचित’चा झेंडा,उपसभापतीपदी प्रियंका रणबागुल यांची निवड!…

दिक्षा कऱ्हाडे 

  वृत्त संपादिका 

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या भूम पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या निवडीत वंचित बहुजन आघाडीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका प्रवीण रणबागुल यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे.जिल्ह्यामध्ये या पदावर विराजमान होणाऱ्या त्या वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या लोकप्रतिनिधी ठरल्या आहेत.

        प्रियंका रणबागुल या वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्या पत्नी आहेत.रणबागुल परिवाराने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या सातत्यपूर्ण कामाची पावती म्हणून या निवडीकडे पाहिले जात आहे.

       धाराशिव जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीसाठी हा क्षण महत्त्वाचा मानला जात आहे.भूम पंचायत समितीमध्ये प्रथमच पक्षाला हे मानाचे पद मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली.तसेच घोषणाबाजी करत जल्लोष केला.