Home Social शिवजयंतीनिमित्त शिवाजी चौक येथे ध्वजरोहण…

शिवजयंतीनिमित्त शिवाजी चौक येथे ध्वजरोहण…

   राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

          छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवाजी चौक येथे उत्साहात ध्वजरोहण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सुरेंदसिंग चंदेल यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले.

         यावेळी उपस्थित नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या पराक्रम व कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच उपस्थितांनी शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प केला.

         या प्रसंगी जेष्ट नेते तथा प्रथम नगराध्यक्ष डॉ महेंद्रकुमार मोहबंसी,नगराध्यक्षा अनिता बोरकर,उप नगराध्यक्ष बबलुभाई हुसैनी,भाजप तालुकाध्यक्ष चांगदेव फाये,माजी सभापति पुंडलिक देशमुख,विजु पा पुस्तोडे,अश्विनी पिंपळकर,नगरसेविका कांता मठ्ठे,शारदा गाथाडे,ईश्वर ठाकरे सह परिसरातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.