Home Social विजयकुमार मनुकाबाई सदाशिव घरत यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सेवापूर्ती आणि ऋणानुबंध सोहळा होणार,”भिसी...

विजयकुमार मनुकाबाई सदाशिव घरत यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सेवापूर्ती आणि ऋणानुबंध सोहळा होणार,”भिसी येथे ३० में ला उत्सहात संपन्न!….

शुभम गजभिये

 विशेष प्रतिनिधी

       चिमूर समाजोन्नती बहुउद्देशीय संस्था,चिमूर व्दारा संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय,भिसी ता.चिमूर,जि.चंद्रपूर येथील मुख्य लिपिक

विजयकुमार मनुकाबाई सदाशिव घरत यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सेवापूर्ती आणि ऋणानुबंध सोहळा ३० में ला संपन्न होणार आहे.

     सदर कार्यक्रम शनिवार,दि.३० मे २०२६.सायंकाळी ६.०० वाजता सुरुवात केली जाणार आहे.कार्यक्रमाचे स्थळ : कला व वाणिज्य महाविद्यालय,भिसी आहे.

        कला व वाणिज्य महाविद्यालय,भिसी येथील मुख्य लिपीक पदावरुन नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होत असलेले विजयकुमार सदाशिव घरत यांच्या सेवेच्या,२८ वर्षे,१० महिने व १८ दिवसांच्या प्रशासकीय काळातील,तसेच यांच्या सामाजिक जीवनप्रवासातील सहकारी म्हणून अनेकांना कार्यक्रमास निमंत्रित केले आहे.

      सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष,माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजवे,हे असणार आहेत.

     या सेवानिवृत्त सोहळ्यास गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.नामदेव किरसान,महाराष्ट्र विधानसभा पक्ष गट नेते तथा माजी मंत्री आमदार विजयभाऊ वडेट्टीवार,हे सदिच्छा भेट देणार आहेत.तर माना आदिम जमात मंडळ मुंबई माजी अध्यक्ष वासुदेवराव धारणे,हे सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.

       सोहळ्याचे विशेष अतिथी म्हणून विधान परिषद सदस्य,नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ आमदार सुधाकरराव अडवाले,गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली,प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे,महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती अध्यक्ष अजय देशमुख,अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ चंद्रपूर जिल्हा उपसेवाधिकारी ग्रामगीताचार्य,प्रा.राम राऊत उपस्थित राहणार आहेत. 

        सदर सोहळ्यास संस्थेचे उपाध्यक्ष,संजय बोमेवार,संस्थेचे सचिव,सुनिल जावळेकर,संस्थेचे कोषाध्यक्ष,दामोदर केदार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

      प्रा.डॉ.विठ्ठल ठावरी (कार्यकारी प्राचार्य),प्रा.डॉ.नत्थु गिरडे,प्रा.डॉ.दिनकर चौधरी, प्रा.डॉ.राजेश सोनकुसरे,प्रा.डॉ. सुनंदा चरडे,श्री.अरविंद लांडगे,श्री.जितेंद्र नन्नावरे,श्री. गोविंदा नंदनवार,श्री.संजय सोनवाणे,श्री.दुर्वास देसाई,श्री. तुकाराम सातपुते,कला व वाणिज्य महाविद्यालय भिसी,ता.चिमूर,जि.चंद्रपूर हे कार्यक्रमाचे विनित आहेत.

       विजयकुमार मनुकाबाई सदाशिव घरत यांच्या सेवापूर्ती निमित्त ऋणानुबंध सोहळा आपणांस कळविण्यात आनंद होत आहे की,कला व वाणिज्य महाविद्यालय,भिसी येथील मुख्य लिपीक पदावरुन नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होत असतांना अनेक शैक्षणिक संस्था,कर्मचारी संघटना,सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात आपणासारख्या जीवलग स्नेहींचा सहवास लाभला याची आम्हाला जाणीव आहे.याच जाणिवेतुन सर्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आमचे कर्तव्य समजतो.

     यामुळे या ऋणानुबंध सोहळ्यानिमित्त अतिथीगणांनी तथा निमंत्रकांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा अशी विनंती आयोजकांची आहे.

         तद्वतच महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ अध्यक्ष प्रकाश म्हसे,महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ महासचिव रावसाहेब त्रिभुवन,विदर्भ अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना अध्यक्ष दिलीप उपासे,विदर्भ अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महासचिव संदीप हिवरकर हे कार्यक्रमाचे अतिथी राहणार आहेत.

      कार्यक्रमाचे स्नेहांकीत श्रीमती मनुकाबाई सदाशिव घरत,सौ.संगीता विजयकुमार घरत,डॉ.मिनल विजयकुमार घरत,चि.कौस्तुभ विजयकुमार घरत आहेत…