राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कोरची तालुक्याच्या वतीने मौजा बोटेकसा येथे भव्य कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले असून,ही बैठक दिनांक 31 मे 2026 रोजी रविवार सायंकाळी 6 वाजता मानूजी कुमरे यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे.
आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक मजबूत करणे,बूथ स्तरावरील नियोजन, कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या तसेच निवडणूक रणनिती यावर सखोल चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा व तालुका स्तरावरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.प्रमुख मार्गदर्शक म्हणून रवीदादा वासेकर _(जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटगडचिरोली ),नंदू भाऊ नरोटे _(कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटगडचिरोली),तसेच क्रांतीदादा केरामी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोरची हे उपस्थित राहणार आहेत.
सदर बैठकीस पक्षाचे सर्व आघाडी प्रमुख,पदाधिकारी,महिला आघाडी,युवक आघाडी,युवती आघाडी,बूथ प्रमुख,भावी जिल्हा परिषद व पंचायत समिती इच्छुक उमेदवार तसेच सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजक मानूजी कुमरे यांनी केले आहे.



