दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
चिमूर :-
दिनांक १६/०५/२०२६ ला चिमूर पोलीसांना मुखबीर व्दारे खात्रीपूर्वक तथा गोपनीय माहिती देण्यात आली की जनावरांना कत्तली साठी बोलेरो पिकअप वाहनानाद्वारे कांपा-चिमूर मार्गे वरोरा येथे वाहतूक अन्वये नेले जाणार आहे.
त्यामुळे पोलिसांनी दोन पंचा सहित पोलीस पथक तयार करून चिमूर वरोरा मार्गावर असलेल्या आय.टि.आय. कॉलेज जवळ नाकेबंदी केली असता तिन पांढऱ्या रंगाचे मालवाहु चारचाकी पिकअप वाहन एका मागे एक येतांना दिसले.
वेळ रात्री 10 ते 10:30 वाजता त्यांना थांबवून वाहनांची झळती घेतली असता सदर वाहनांमध्ये गोवंशीय जनावरे निर्दयीपणे दाटीने कोंबुन भरलेल्या अवस्थेत आढळून आले.
महिंद्रा पिकअप क्रं. MH 34,B-4064 चालकाचे नाव सचिन धनराज वैद्य वय 33 वर्षे राहणार आकोट जिल्हा भंडारा,दुसरे वाहन क्रं. MH 36, F-2534 चालकाचे नाव अमोल लिलाधर पंचभाई वय 40 वर्षे राहणार रामपुरी वार्ड पवनी जिल्हा भंडारा,तिसरे वाहन क्रं. MH 36 AA-0076 चालकाचे नाव राजेश सोमेश्वर बावनकर वय 26 वर्षे राहणार वेळवा जिल्हा भंडारा असे आहे.
वाहन क्र. MH 34,BZ- 4064 मध्ये 3 नग लाखे पांढरे रंगाचे गौवंशीय जनावरे किंमत 30,000 वाहनाची किंमत 8,00000/- रुपये, वाहन क्र.MH 36 F – 2534 मध्ये 3 नग गौवंशीय जनावरे किंमत 30,000 रुपये वाहनाची किंमत 8,00000/-रुपये,आणि वाहन क्र.MH 36,AA-0076 मध्ये 4 नग गौवंशीय प्रत्येकी नग किंमत 10,000/-रुपये प्रमाणे 40,000/- रुपये वाहनाची किंमत 8,00000/-रुपये असा एकूण 25,00,000/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
सदरची कारवाई चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक दिप्ती मरकाम,पोलीस अंमलदार रोहित,पोलीस हवालदार पिसे,पोलीस अमलदार गणेश वाघ,पोलीस अमलदार सचिन खामणकर पुढील तपास करीत आहे.



