Home Crime पुराव्यासह भ्रष्ट्राचाराची तक्रार केल्यानंतरही कुरखेडा प.स.गट विकास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष! — चौकशी...

पुराव्यासह भ्रष्ट्राचाराची तक्रार केल्यानंतरही कुरखेडा प.स.गट विकास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष! — चौकशी करणार की आंदोलनाला सुरुवात करायची?

राजेंद्र रामटेके

विशेष प्रतिनिधी

  गडचिरोली जिल्हातंर्गत कुरखेडा तालुक्यातील मौजा रामगड ग्रामपंचायत येथे झालेल्या भ्रष्ट्राचाराची लेखी तक्रार पुराव्यासह गटविकास अधिकारी,पंचायत समिती कुरखेडा,यांच्याकडे केली असताना त्यांनी सदर तक्रारींकडे दुर्लक्ष केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

       यामुळे अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने रामगड ग्रामपंचायत मध्ये भ्रष्ट्राचार होत आहे काय असा प्रश्न तक्रारदार श्री.नितीन तुळशीराम केराम यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती कुरखेडा यांना केला आहे.

      याचबरोबर ग्रामपंचायत रामगड येथील भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर कारवाई न झाल्यास जनआक्रोश मोर्चा’ काढण्यांबाबतचा इशारा तक्रारदार श्री.नितीन तुळशीराम केराम व गावकऱ्यांनी दिला आहे.

अर्जदारांचे म्हणणे….

     १) पंचायत समिती कुरखेडा आणि जिल्हा परिषद गडचिरोली येथे रामगड ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका कु.अनुसया झाडू तुमडाम यांनी केलेल्या आर्थिक भ्रष्टाचाराबाबत पुराव्यासह याअगोदर तक्रार दाखल केली होती.

     २) सदर तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही जिल्हा परिषद गडचिरोली येथे विचारणा केली असता,तिथल्या अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पंचायत समिती कुरखेडा यांना दिले असल्याचे तोंडी सांगितले आहे.

     ३). परंतु,जेव्हा तक्रारदार प.स.कुरखेडा कार्यालयात विचारना करण्यास येतात,तेव्हा त्यांना समाधानकारक उत्तर न देता चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे. 

      शासकीय प्रशासनाच्या टाळाटाळ करणाऱ्या भूमिकेमुळे तक्रारदारांना दाट शंका आहे की,रामगड ग्रामपंचायतीमध्ये झालेला आर्थिक भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न प्रशासकीय स्तरावर केला जात आहे.

     ४) भ्रष्टाचारासारख्या गंभीर प्रकरणात होत असलेला विलंब हा संशयास्पद असून,दोषींना पाठीशी घालण्याचा हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे.

मागणी व इशारा….

       तक्रारदाराच्या तक्रारीचे निवारण करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.जर येत्या ५ दिवसांच्या आत या प्रकरणाचा निकाल लागला नाही किवा चौकशी अहवाल सादर झाला नाही,तर रामगड येथील त्रस्त जनता पंचायत समिती कुरखेडा येथे ‘भव्य जनआक्रोश मोर्चा’ काढेल.

     या दरम्यान होणाऱ्या कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास शासन आणि प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील,याची कृपया नोंद घ्यावी.

    तक्रारदार श्री.नितीन तुळशीराम केरामी व समस्त ग्रामस्थ,रामगड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गडचिरोली यांना तक्रार अर्ज २९ एप्रिल २०२६ ला सादर केला आहे.