Home Social झरी नऊ कुंड सिद्धेश्वर नागनाथ मंदिराला ‘पर्यटन स्थळ’ दर्जा द्या :- भाविकांची...

झरी नऊ कुंड सिद्धेश्वर नागनाथ मंदिराला ‘पर्यटन स्थळ’ दर्जा द्या :- भाविकांची मागणी….

        माहिती

 सिद्धेश्वर वा.कुलकर्णी

  चाकूर, लातूर :- ‘भारताची दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकूर तालुक्यातील झरी नऊ कुंड येथील प्राचीन श्री सिद्धेश्वर नागनाथ मंदिराला राज्य सरकारने तातडीने ‘पारदर्शक पर्यटन स्थळ’ म्हणून दर्जा द्यावा,अशी जोरदार मागणी होत आहे.

        हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर दगडावर दगड रचून उभारलेले अनमोल तीर्थक्षेत्र आहे.नवसाला पावणारा देव म्हणून याची ख्याती आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे सात दिवसांचा सप्ताह भरतो व राज्यासह देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात.

. सुविधांचा अभाव,विकास रखडला….

      भाविकांची प्रचंड गर्दी होत असूनही येथे वाहनतळाची व निवासी सुविधांची व्यवस्था नाही.मंदिराच्या विकासासाठी 25 कोटी रुपये मंजूर होऊनही अद्याप अपेक्षित काम झालेले नाही,असा आरोप मंदिर ट्रस्टने केला आहे.

ट्रस्टचे मत….

     मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी सुगावकर म्हणाले,”निधी येऊनही कामे रखडली आहेत.शासनाने लक्ष दिल्यास हे स्थळ नक्कीच देशपातळीवर नावारूपास येईल.भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मूलभूत सुविधा तातडीने मिळाव्यात.”

.          पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे….

     या संदर्भात अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेश प्रवक्ते सिद्धेश्वर वा. कुलकर्णी यांनी सांगितले की,”लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी प्रत्यक्ष मंदिरास भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी.या प्राचीन स्थळाला पर्यटन दर्जा मिळाल्यास परिसराचा विकास होऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.”

        शासकीय उदासीनतेमुळे या तीर्थक्षेत्राचा विकास खुंटला असून सरकारने तातडीने पावले उचलावीत,अशी मागणी त्यांनी केली आहे.