Home Crime चारभट्टीच्या जगंलात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त…  — वन विभागाची...

चारभट्टीच्या जगंलात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त…  — वन विभागाची कार्यवाही…

     राकेश चव्हाण 

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

            कूरखेडा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या नियतक्षेत्र चारभट्टी कक्ष क्र.१७४ येथे अवैधपणे ट्रॅक्टर द्वारे रेती वाहतूक करण्यात येत असल्याचा गोपनीय माहिती वरून वनविभागाचा पथकाने सापळा रचत काल मध्यरात्री ट्रॅक्टर जप्त केला व आरोपी विरोधात वनगुन्हा दाखल केला अशी माहिती दि १२ मे रोजी वनपरिक्षेत्र कार्यालय कूरखेडा यांचा वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

           धनंजय गोमाजी बंसोड रा.धानोरी यांचा मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३३ ए सी ४३४१ या वाहनाद्वारे अवैध रेती वाहतूक सूरू होती.दरम्यान वनपथकाने कार्यवाही करीत ट्रॅक्टर जप्त केला सदर कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत गोपूलवाड, क्षेत्र साहायक बी बी तूलावी ,वनरक्षक मुकेश सयाम, वनरक्षक एम के दूधबळे, वनमजूर मधुकर दरवडे, वाहनचालक चेतन कूमरे यांचा चमूने केली.