आरमोरी नगरपरिषद ची नळ योजना निकृष्ट दर्जाची… पाणी टंचाईच्या काळात हजारो लिटर पाणी वाया…

रुपेश बारापात्रे

आरमोरी शहर प्रतिनिधी

आरमोरी –

      स्थानिक नगर परिषद परिसरात आधीच पाणी टंचाई असताना नगर परिषदचे निकृष्ट दर्जाचे नळ योजनेचे पितळ उघडे पडले असून आरमोरी येथील मुख्य ठिकाणी भर रस्त्यावर भगत सिंग चौकात हजारो लिटर पाणी व्यर्थ वाया जात असून नगर परिषद करोडो रुपयाचे काम अश्याच पधतीने करून कंत्राट दारांचे व नगर परिषद चे पोट भरत आहे बाकी सर्व सामान्य जनतेचे काय? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून जनता मात्र वाऱ्यावरच परंतु नगर परिषद तुपात असच म्हणा ची वेळ आरमोरी वासियावर आली आहे.