गुरुदेव सेवामंडळ पदाधिकारी पारशिवनीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन!

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी 

पारशिवनी:- महाराष्ट्रातील आधुनिक संत, कवी, समाजसुधारक व राष्ट्रीय उत्थानाची भावना असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती पारशिवनी बाजार चौक येथे राष्ट्रसत तुकडोजी महाराज यांचे पुतळा अभिवादन करून साजरी करण्यात आली.

           बाजार चौक पारशिवनी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पुतळा जवळ आयोजित कार्यक्रमात पारशिवनी गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसत च्या विचाराच वारसा घेऊन मार्गक्रमण करणारे प्रमुख मोहन लोहकरे , पत्रकार गोपाल कडु , पारशिवनी पोलिस निरिक्षक रविकुमार थोरात जिल्हा परिषद शाळा बाबुलवाडा चे मुख्यअध्यापक उमांकात बांगळकर , श्री धर्मदास झोड , श्री बंडुजी कोटागले, श्री अमोल सावरकर , श्री ईश्वर ढोबळे सर यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

        यांच्यासह सर्व उपस्थित पदाधिकारी पारशिवनीच्या वतीने गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसंत मंडळचे सर्व पदाधिकारी सभासद यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुतळावर माल्य अपर्ण करून अभिवादन केले.