पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय येथे विविध स्पर्धा व वृक्षरोपण करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आले.

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी

पारशिवनी::-आज दि. 1 मे 2024 ला पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय आणि भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय रेल्वे स्टेशन रोड कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने 65 वा महाराष्ट्र दिन महाविद्यालय चे सर्व शिक्षक व शिक्षकेतरवृंद तसेच विद्यार्थी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. 

           या प्रसंगी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्माचे स्मरण करण्यात आले. तसेच हुतात्माचे प्रतिमेच माल्यअपर्ण करून दिपप्रज्जवलन करून कार्यक्रमा ची शुरुवात करण्यात आले.

         पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे मुख्याद्यापक श्री. लाखपाले सर प्राचार्य श्री बनकर सर, शिक्षक व शिक्षकेतरवृंद व विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

         या प्रसंगी प्राचार्य श्री बनकर सर यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्व उपस्थितांना समजावून सांगितले. तसेच सर्व उपस्थितांनी जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गायन केले. महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आले.

            कार्यक्रमाचे संचालन सौ. पुष्पा कोल्हे यांनी केले तसेच महाराष्ट्र दिना निमित्य विद्यार्थ्यांकडून निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच गीत गायन चे कार्यक्रम उपस्थित करण्यात आले त्यानंतर प्राचार्य श्री लाखपाले सर यांनी सर्वाना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानले व उपस्थितांना अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.