साईबाबा कला विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी 

  पारशिवनी:-साईबाबा कला विज्ञान महाविद्यालय पारशिवनी येथे एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.

          कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून ज्ञानरंजन क्रीडा बहुउद्देशीय संस्था पारशिवणीचे सचिव श्री प्रकाशजी डोमकी व उपाध्यक्ष श्री माणिकजी मेश्राम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

           अध्यक्षांच्या परवानगीने मुख्य ध्वजारोहण महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. योगेंद्र एस .नगराळे यांच्या हस्ते पार पडला. महाराष्ट्र दिनानिमित्त संस्थेचे सचिव श्री प्रकाशजी डोमकी व प्राचार्य डॉ. योगेंद्र एस.नगराळे यांची भाषणे झाली.

          आभार प्रदर्शन प्रा.अनिल बोंद्रे यांनी केले. कार्यक्रमाकरिता साईबाबा विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य अभिजित फुलबांधे, दिल्ली इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक साईबाबा कला व विज्ञान महाविद्यालयाचे शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.