शहर विकास मंच द्वारे १ मे महाराष्ट्र आणि कामगार दिवस निमित्य कन्हान नगर परिषद सफाई कर्मचाऱ्यांचा भेट वस्तु देऊन सत्कार….

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी 

कन्हान : – कन्हान शहर विकास मंच द्वारे १ मई महाराष्ट्र आणि कामगार दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले.

          कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक प्रभाकर रुंघे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

        यावेळी अर्जुन पात्रे , प्रदीप बावने यांनी महाराष्ट्र आणि कामगार दिवस वर उपस्थितांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कन्हान – पिपरी नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांचा भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला . शेवटी अल्पोहार वितरित करुन कार्यक्रमाची सांगता करुन महाराष्ट्र आणि कामगार दिवस कार्यक्रम मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रदीप बावने यांनी केले आणि आभार प्रदर्शन ऋषभ बावनकर यांनी केले.

          कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक प्रभाकर रुंघे , प्रदीप बावने , अर्जुन पात्रे , माहेर इंचुलकर , उमेश मेश्राम , अक्षय मेश्राम , हर्षल नेवारे , शुभम नागमोते , नितिन मेश्राम सह आदि सदस्यांनी सहकार्य केले.