श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आळंदी देवाची यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीताने ध्वजास मानवंदना दिली. 

       यावेळी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विश्वस्त दिपक पाटील, प्राचार्य दीपक मुंगसे समवेत संस्था व विद्यालयाच्या सर्व घटक उपस्थित होते.

         कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्षा काळे, संदीप वालकोळी व रामदास वहिले या शिक्षकांचा प्रशालेत केलेल्या गौरवास्पद कार्यामुळे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उदय पवार, हर्षवर्धन पवार, सोमनाथ मोरे, रवींद्र उंद्रे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष उध्दव डिघोळे, विद्यालयाचे उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अनिता गावडे, शिक्षक प्रतिनिधी दत्तात्रय वंजारी, शिक्षकेतर प्रतिनिधी शिवाजी जाधव, चरित्र समितीचे सदस्य विलास वाघमारे, भाऊसाहेब पाटील, ज्ञानेश्वर जाधव, चंद्रकांत गोरे, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले व प्रदीप काळे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.