बोटावर शाई दाखवा, आळंदीत आरोग्य तपासणीत १००% सवलत मिळवा… — डॉ.सुनील वाघमारे यांच्या वैभवी मल्टीस्पेशालिटीमध्ये स्तुत्य उपक्रम…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : मतदान जनजागृतीसाठी आळंदी येथील डॉ.सुनील वाघमारे यांच्या वैभवी मल्टीस्पेशालिटीच्या वतीने बोटावर शाई दाखवा आणि तपासणीत सवलत मिळवा, असे अभियान हाती घेण्यात आले असून, याअंतर्गत वैभवी मल्टीस्पेशालिटी मध्ये तपासणी शुल्कामध्ये मतदात्यांना १०० टक्के सवलत देणार आहेत. असे वैभवी मल्टीस्पेशालिटीचे संचालक डॉ.सुनील वाघमारे यांनी सांगितले आहे. मतदानानंतर पुढील दोन दिवस मतदात्यांना आरोग्य तपासणीचा लाभ मिळणार आहे.

         पुणे जिल्ह्यातील शिरूर, मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या सहकार्याने व डॉ.सुनील वाघमारे यांच्या वैभवी मल्टीस्पेशालिटीच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम सुरु करण्यात आले आहे.

        १३ तारखेला मतदान करून बोटांवरील शाई दाखवा आणि आळंदी येथील चाकण चौकातील डॉ. सुनील वाघमारे यांच्या वैभवी मल्टीस्पेशालिटीमध्ये आरोग्य तपासणी शुल्कामध्ये १०० टक्के सवलत मिळवा, असे आव्हान नागरिकांना तसेच मतदारांना केले आहे. हे अभियान १४ आणि १५ मे असे सलग दोन दिवस चालणार आहे. मतदारांना आरोग्य तपासणीत शुल्कात सवलत १०० टक्के सवलत मिळणार आहे. राष्ट्र उभारणीच्या कार्यात मोलाचे योगदान देण्यासाठी प्रत्येकांने मतदान करणे आवश्यक आहे. असे डॉ.वाघमारे यांनी सांगितले आहे.