आमदार दत्तात्रेय भरणे यांची प्रचारात आघाडी… — गावोगावी भेटीगाठींचा झंझावात सुरू… — तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

            बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारामध्ये इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी प्रचंड आघाडी घेतली आहे. आ. भरणे तालुक्यातील खेडोपाड्यात जाऊन मतदार व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन लोकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली विकासकामे दाखवून सुनेत्रा पवार यांना मतदानाचे आवाहन करीत आहेत.

          बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आजवर इंदापूर तालुक्याचा नेहमीच सिंहाचा वाटा राहिला आहे. या वेळी तर तालुक्यातील दोन्ही दिग्गज नेते सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सोबत काम करत असल्याने इंदापूर तालुक्याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.

           त्यामुळे येथील विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार अगदी तळागाळात पोहचवण्यासाठी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे.

        आमदार भरणे सह सर्व कार्यकर्ते घराघरात सुनेत्रा पवार यांचे घड्याळ चिन्ह पोहचवत आहेत.

         निमगाव केतकी येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रिकांचे वाटप करताना आमदार दत्तात्रय भरणे.

          दिवसांपासून तालुक्यातील गावागावांत जाऊन घोंगडी बैठका, वैयक्तिक गाठीभेटी घेत आहेत. त्यामुळे तालुक्यातील आमदार भरणे यांच्यावर प्रेम करणाऱ्या मतदार व कार्यकत्यांमध्ये वेगळी ऊर्जा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आपला नेता गतीने काम करत असल्याचे पाहून गावोगावे कार्यकर्त्यांच्या या गाठीभेटी दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी स्वतः आमदार भरणे सहभागी होताना दिसत आहेत.

           आमदार भरणे यांनी निमगाव केतकी येथे सुरू असलेल्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी होत मतदारांना पक्षाचे चिन्ह असलेल्या पत्रिकांचे वाटप केले. प्रामुख्याने गावागावांतील कार्यकत्यांचे आपापसातील मतभेद स्वतः लक्ष घालून मिटवत सर्वांना एकदिलाने काम करण्यास लावल्याने सुनेत्रा पवार यांच्यासाठी इंदापूर तालुक्यातील राजकीय वातावरण अत्यंत पोषक बनल्याचे बोलले जात आहे.