साकोलीत बुद्ध पौर्णिमा निमित्त प्रबोधनात्मक कव्वाली…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

          साकोली – स्वाभिमानी सामाजिक संघटना भीम सेना साकोलीच्या वतीने 23 मे 20234 साय.6 वाजता वैशाख बुद्ध पोर्णिमे निमित्ताने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,बुद्ध विहार एकोडी रोड साकोली येथे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध बुद्ध,फुले,शाहू, आंबेडकरी गीतांचा बुलंद आवाज राष्ट्रीय प्रबोधनकार विकास राजा यांचा संगीतमय प्रबोधनात्मक कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

             या प्रबोधन कार्यक्रमाचे उदघाटक नानाभाऊ पटोले आमदार साकोली विधानसभा क्षेत्र तथा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी, अध्यक्ष महेंद्र ठाकरे साहेब मॅनेजिंग डायरेक्टर शुभमहालक्ष्मी ग्रुप साकोली राहणार आहेत.

           तरी साकोली परिसरातील सर्व बुद्ध उपासक, उपसिका व सर्व बहुजन बांधवांनी या प्रबोधनात्मक कव्वाली कार्यक्रम पाहण्यास यावे असे आव्हान भीम सेना अध्यक्ष धम्मा वासनिक, शुभम राऊत, भावेश कोटांगले,कुलदीप राऊत,विक्की नंदेश्वर, सौरभ राऊत,रक्षित कांबळे,मोहित कराळे यांनी केले आहे.