दर्यापूर येथील एकविरा कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स मधील विद्यार्थ्यांची गरुडझेप… — कुशल दिनेश म्हाला या विद्यार्थ्याने 92.17% गुण प्राप्त करत पटकावला तालुक्यातुन प्रथम क्रमांक…

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

              एकविरा कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयाची विजयी लय कायम ठेवत. महाविद्यालयाचा 99% टक्के निकाल लागला आहे.

             सत्र 23, 24 मध्ये घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेमध्ये कुशल दिनेश म्हाला या विद्यार्थ्याने 92.17% गुण मिळवत महाविद्यालयातून व तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला. गितेश कलाने या विद्यार्थ्याने 87.50% गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. कारुण्य भडांगे या विद्यार्थ्याने 87% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.

            यासह हस्तिका पानझडे 85.83% .अनुष्का तायडे 85.50% .गौरी तळोकार 85.33% .यांनी गुण प्राप्त केले आहेत. तर एकविरा कॉलेज मधील 80% च्यावर 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

             एकविरा महाविद्यालयातून यंदा बारावी परीक्षेत एकूण 79 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी एक विद्यार्थी हा अनुपस्थित असल्यामुळे निकाल 99% लागला आहे विद्यार्थ्यांनी बुद्धीचातुर्याच्या जोरावर विजय संपादित केला असून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय प्राचार्य राजेंद्र ताटस्कर सर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सह शालेय विश्वस्त मंडळाला दिले आहे.

           विजय संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन स्तरावर कौतुक झाले असून पुढील यशस्वी शैक्षणिक कारकीर्द पार पाडण्यासाठी शुभेच्छा दिल्या.