राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधि
स्थानिक मालेवाडा येथील ॲड.विठ्ठलराव बनपुरकर मेमोरियल कला व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागाद्वारे महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा वर एक दिवसीय कार्यशाळाचे आयोजन प्राचार्य डॉ.एच.एम. कामडी त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.नंदेश्वर,प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.वैद्य, प्रमुख अतिथी प्रा.डॉ.ठाकरे,प्रा.नरुटी हे होते. अध्यक्षांनी अध्यक्षीय भाषणात हे स्पर्धेची युग आहे. स्पर्धा परीक्षेतून विद्यार्थ्यांना अनेक शासकीय नोकऱ्या लागण्याची संधी उपलब्ध होते.नियमित वाचनाचे महत्त्व पटवून दिले. आपल्या महाविद्यालयात अनेक स्पर्धा परीक्षेचे पुस्तक उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा असे मत त्यांनी व्यक्त केले.
ग्रंथालाद्वारे विविध ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, नियतकालिका तसेच स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन पुस्तके, ग्रंथालयातील उपलब्ध वाचन साहित्य हे सर्वांसाठी खुले आहेत.अशी माहिती ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ.पल्लवी काळे यांनी दिली.
आभार प्रदर्शन ग्रंथालय परिचय दीपक बनपूरकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी साठी प्रा.ठाकूर, प्रा.सहारे, प्रा.अष्टेकर, उईके ,सेलोकर,समर्थ ,जांभुळे, वालदे तसेच भरपूर विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.



