Home Social श्री संत गोरोबा काका कूंभार समाज मंडळाचा स्तुत उपक्रम… — पोलीस...

श्री संत गोरोबा काका कूंभार समाज मंडळाचा स्तुत उपक्रम… — पोलीस भरतीत पात्र उमेदवार व रक्तदात्यांसह भजनी मंडळ यांचे सत्कार… 

     राकेश चव्हाण 

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

        संत शिरोमणी गोरोबाकाका कूंभार समाज मंडळ कूरखेडा यांचा वतीने श्री संत शिरोमणी गोरोबा काका महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त नूकतीच जिल्हात राबविण्यात आलेल्या पोलीस भरतीत पात्र ठरलेले शहरातील उमेदवार तसेच पूण्यतिथी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात स्वयंस्फूर्त रक्तदान करणारे रक्तदात्यांचा आमदार रामदास मसराम यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.

            याप्रसंगी शिवसेना लोकसभा संघटक सूरेन्द्रसिंह चंदेल ,कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटील हरडे, माजी जि प सदस्य अशोक इंदूरकर ,सामजिक कार्यकर्ते नगर पंचायत गट नेते नगर सेवक आशिष काळे, लालचंद धाबेकर,नगरसेविका कांता मठ्ठे,धनपाल मिसार,आदि हजर होते यावेळी जिल्हा पोलीस भरतीत पात्र शहरातील अदनान खान पठाण,निलम शिंदे,श्रृती कसारे व आफरीन शेख यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच गोरोबाकाका पूण्यतिथी निमित्त भजन सादर भजन मंडळी व स्वयंस्फूर्त रक्तदान करणारे १८ रक्तदात्यांचा सूद्धा प्रमाणपत्र प्रदान करीत आमदारांचा हस्ते सत्कार करण्यात आला.

                                 श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांचे पुण्यतिथि कार्यक्रमाची पार्श्वभूमी सामजिक कार्यकर्ते आशिष काळे यांनी विशद केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन गजानन भोयर यांनी केले तर यशस्वीतेसाठी कूंभार समाज मंडळाचे भास्कर गूंडरे, तूळशिराम बूरबांदे, रमेश पात्रे,मुरारी कोटागंले ,प्रशांत कोटागंले ,हेमंत पात्रे, महेश कोटागंले, हिमांशू बूरबांदे, टोमेश्वर बूरबांदे, उमेश गूंडरे, कार्तिक कोटागंले, गोलू गूंडरे, व कूंभार समाज मंडळाचा सदस्यांनी सहकार्य केले.