Home शैक्षणिक छत्रपती शिवाजी कला महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ…

छत्रपती शिवाजी कला महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ…

युवराज डोंगरे /खल्लार 

         उपसंपादक 

          छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगाव पूर्णा येथे विद्यार्थी विकास विभाग द्वारा आयोजित 8 वा पदवी वितरण समारंभ नुकताच प्राचार्य सुवर्णा जवंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

         कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अधिसभा सदस्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तथा इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. रविन्द्र मुन्द्रे, प्रा.डॉ. रविन्द्र इचे, प्रा. डॉ. प्रविण सदार व प्रा. विपीन लिल्हारे हे मान्यवर उपस्थित होते, तर कार्यक्रमाला विद्यार्थी विकास विभागाचे अधिकारी प्रा. डॉ. भारत कल्याणकर, प्रा. डॉ. हरीश काळे, प्रा. डॉ. आशिष काळे, प्रा. डॉ. अतुल चऱ्हाटे, प्रा. सागर भुसारी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

        उन्हाळी 25 वार्षिक परीक्षमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची वाङमय पारंगत (एम.ए. समाजशास्त्र) व वाङमय स्नातक (बी.ए.) पदवी प्रदान करण्यात आली. एकुण 57 विद्यार्थ्यांना याप्रसंगी पदवी वितरीत करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. हरीश काळे, प्रास्ताविक प्रा.डॉ. भारत कल्याणकर यांनी केले आभार डॉ. आशिष काळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता बहुसंख्येने आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.