Home Social जि.प.मराठी शाळा गायवाडी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी…

जि.प.मराठी शाळा गायवाडी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी…

युवराज डोंगरे/खल्लार 

        उपसंपादक 

           जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा गायवाडी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली, प्रमुख पाहुणे म्हणून थिलोरी केंद्राचे केंद्रप्रमुख संजय बोबडे, तसेच गायवाडी ग्रामपंचायत चे सरपंच विजय जामनिक, उपसरपंच वसंत साखरे, ग्रामपंचायत सदस्य योगेश बुंदे, शरद पाचडे, ग्रामविकास अधिकारी के बी मदने, तसेच सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ नागे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रतिभाताई भांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.

           जिल्हा परिषद शाळा गायवाडी ला शिक्षक आणि विध्यार्थी यांना शाळेत जाण्या येण्या करिता रस्त्याचा त्रास होत होता. हाच मुद्दा नव्यानेच शाळेत डी.आर. जामनिक विषय शिक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून रुजू झालेले यांनी शिक्षकांची जाण्या येण्याची समस्या हरिभाऊ यांच्या कडे मांडली त्यावर त्यांनी शाळेच्या मागच्या बाजूला शाळेच्या गेट चे बांधकाम करून 10 फुटाचे गेट देऊन जाण्या येण्याचा मार्ग मोकळा करण्यात याला या निमित्त त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

            कार्यक्रमाला मुख्याध्यापक डी.आर. जामनिक,विषय शिक्षिका सरिता फुले, कल्पना इंगळे, अमृता दळवी, अंगणवाडी सेविका मदतनीस, स्वयंपाकी उपस्थित होते.शेवटी मुख्याध्यापक डी आर जामनिक यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.