सुनेत्रा वहिनी पवार जास्तीत जास्त मताधिक्य घेऊन दिल्लीच्या पार्लमेंट मध्ये खासदार होणारच :- युवा नेते श्रीराज भरणे…  — बारामतीच्या बरोबरीने सुनेत्रा वहिनींना इंदापूर मधून मताधिक्य देऊ,श्रीराज दत्तात्रय भरणे यांनी केला विश्वास व्यक्त…

  बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

        Bvलोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रचारासाठी युवा नेते श्रीराज भरणे हे कमालीचे सक्रीय झाले असून ते घरोघरी पायी चालत मतदारांशी संवाद साधत सुनेत्रा वहिनी पवारांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत.

       यंदाच्या लोकसभा निवडणुकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुनेत्रा पवार या स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असल्यामुळे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सौ. सुनेत्रा पवारांना इंदापूरमधुन विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यासाठी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांपासून ते अगदी गावापातळीवरील बुथ कमिटीच्या सर्व कार्यकर्त्यांना प्रचार यंत्रणेला लावले असुन स्वतः आमदार भरणे सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत गावोगावातील प्रत्येक कार्यकर्त्याशी संपर्क करत अतिशय नियोजनबद्ध लोकसभा निवडणुकीची व्यूहरचना आखली आहे.

          तर दुसरीकडे आमदार दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भरणे यांनी सुद्धा प्रचारांमध्ये जोरदार आघाडी घेतली असून गेल्या काही दिवसांपासून त्यांनी तालुक्याच्या पश्चिम भागात घरोघरी जातात पायी प्रचार दौरा चालू केला असून श्रीराज भरणेंच्या सवांद यात्रेला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

           उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात होत असलेली विकास कामे जनतेपुढे मांडून विकासाच्या मुद्यावर ते सुनेत्रा पवारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.

         या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने मतदारांशी संवाद साधताना श्रीराज भरणे म्हणाले की, आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत झालेली सर्व विकासकामे ही फक्त अजितदादा पवार व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातुन झालेली आहेत.

           इंदापूर तालुक्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या प्रश्नासाठी आपल्याला अजितदादांचे मोलाचे सहकार्य लाभत असते. अजित पवारांच्या विकासाभिमुख राजकारणामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांच्याकडे आशेने बघत आहे.

          त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये परिवर्तन अटळ असून जनतेच्या मनातील उमेदवार म्हणुन सुनेत्रा पवार लाखो मतांनी निवडूण येणार आहेत. आणि या मताधिक्यामध्ये आम्ही आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली बारामती तालुक्याच्या बरोबरीने इंदापूर तालुक्यातून मताधिक्य देणार असल्याचा विश्वास श्रीराज भरणे यांनी व्यक्त केला.