लग्नसराईच्या काळात बस फेऱ्यांचा दुष्काळ ….. — प्रवाशांचे हाल… — निवङणूकांचे ग्रहण..

       सुधाकर दुधे

तालुका प्रतिनिधी सावली..

      चक्क लग्नसराईचा काळ सुरु असताना बस फेऱ्याचा दुष्काळ पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली असल्याचे पुढे आले आहे.यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून नाईलाजास्तव खाजगी वाहनांचा उपयोग करावा लागत आहे.

          परिणामी खाजगी वाहतुकीमुळे खिशाला अतिरिक्त कात्री लागण्याची वेळ निर्माण झाली आहे. “बहुजन हिताय बहुजन सुखाय” म्हणत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंङळाने जनतेच्या हितासाठी बसेसची व्यवस्था निर्माण केली.

         त्याही पलिकडे महिलांना प्रवासासाठी योग्य सवलत दिली. परिणामी मोठ्या प्रमाणात महिला प्रवाशी परिवहन महामंडळाकडे आकर्षित झाल्या.मात्र परिवहन मंडळाची अनियमितता,निवडणुकीचे ग्रहण,आदी कारणास्त्व परिवहन मंडळाची सेवा डोकेदुखी ठरत असल्याचे दिसुन येत आहे.

         त्यामुळे खाजगी वाहतुकीला चालना मिळत आहे.

जोरात सुरू असलेली लग्न सराई आणि लोकसभा निवडणूक यामुळे खाजगी ट्राव्हल्स मालकांना सुगीचे दिसून आल्याचे दिसत आहे.

          खाजगी वाहनधारकांची मनमानी दिसून येत असल्याने याचा फटका प्रवाशांना बसत असुन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.त्यामुळे प्रवाशांचे बेहाल होत असल्याचे दिसत आहे.

         देशात लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणूक सात टप्प्यात होत आहे,यातील दोन टप्पे नुकतेच पार पडले आहेत.महाराष्ट्रातील पुर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील. लोकसभेसाठी मतदान प्रक्रीया पार पडली,या प्रक्रीयेत अनेक आगारांच्या कित्येक बस मतदानासाठी विविध ठिकाणी पाठविण्यात आल्याने अनेक प्रवाशांना बसची तातकडत प्रतिक्षा करावी लागत आहे.

       यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सोबतच आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

          मतदान प्रक्रीयेतील अधिकारी,कर्मचारी,पोलीस कर्मचारी यांच्या ड्यूटी लागल्या आहेत,त्यांना मतदान ठिकाणी ने-आण करणे व ईवीएम मशीन स्ट्रांग रुम मध्ये सुरक्षित पोहचविणे आदी कामात.एस टी बस चा वापर करण्यात आला.,त्यामुळे नियमित जाणाऱ्या बसेसच्या फे-या बंद करण्यात आल्याने प्रवाशांना याचा मोठा फटका बसला.

       दुसरीकडे खाजगी ट्राव्हल्स मालकांची मनमानी दिसत आहे,मतदान दिवशी नेहमी पेक्षा १०,२० रुपये प्रवाशांना कडून जास्त घेत असल्याचे दिसून येत होते,अनेक प्रवासी आप आपसात याची चर्चा करताना. दिसत होते.यामुळे मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत असल्याचे बोलले.जात आहे.

        लोकसभेच्या निवडणुकीचे उर्वरित पाच टप्पे आहेत,त्यावेळेस सुध्दा एस.टी. बस चा वापर होणार,परंतु प्रवाशांना सेवेसाठी असलेल्या बसेसच्या फे-या नियोजित वेळेस सुरू करून प्रवाशांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.विशेष म्हणजे ऐन लग्न सराईची मोठी धामधूम असताना बस फेऱ्यांचा सुरु झालेला दुष्काळ आणि निवङनुकीचे ग्रहण प्रवाशासाठी त्रासदायक ठरत आहे.